1990 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री मोनिका बेदीला आता पडद्यावर पुनरागमन करायचे आहे आणि ती एका चांगल्या संधीच्या शोधात आहे. तिनं केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचं आयुष्य खूपच वादग्रस्त राहिलं, यामुळं तिचं करिअर देखील उद्धवस्त झालं. मोनिका गँगस्टर अबू सालेमसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, यादरम्यान ती अनेक बॉलिवूड सिनेमात दिसली पण यानंतर तिच्या करिअरची गाडी रूळावरून घसरू लागली.
सिद्धार्थ कन्ननच्या एका नवीन मुलाखतीत मोनिकाने कबूल केले की, तिच्या भूतकाळामुळे चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करण्यास तयार होत नव्हते. मोनिकाला कागदपत्रांच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगातही जाण्याची वेळ आली. तिच्या नावाला लागलेल्या कलंकामुळे तिला घर आणि जोडीदार मिळणेही कठीण झाल्याचे तिने सांगितले.
मोनिकाला तिच्या भूतकाळाविषयी विचारले असता ती म्हणाली की, 'मला आता कशाचीच पर्वा नाही. माझ्यासोबत आता सर्व चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, ते कसे घडले हे मला माहित नाही, कदाचित देवाचा यात काहीतरी संबंध असेल, परंतु मला आता कसलीच पर्वा करायची नाही.
मोनिकाला तिच्या भूतकाळाविषयी विचारले असता ती म्हणाली की, 'मला आता कशाचीच पर्वा नाही. माझ्यासोबत आता सर्व चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, ते कसे घडले हे मला माहित नाही, कदाचित देवाचा यात काहीतरी संबंध असेल, परंतु मला आता कसलीच पर्वा करायची नाही.
मोनिका बेदी म्हणते, 'मी पूर्वी व्हिडिओ पाहायचो आणि खूप अस्वस्थ व्हायचे. लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगतील. पूर्वी मी विचार करायचो की, मला किती दिवस स्पष्टीकरण देत राहावे लागेल... पण आता मला कोणाचीही पर्वा नाही. आता मला नव्याने सुरुवात करायची आहे.
मोनिकाने कबूल केले की, तिचा भूतकाळ आजपर्यंत तिच्या भविष्यावर परिणाम टाकताना दिसला. ती म्हणते हो, माझ्या भूतकाळामुळे माझ्या आयुष्यात अनेक अडथळे आले आहेत. मला खात्री आहे की, माझ्या भूतकाळामुळे लोक माझ्यासोबत काम करण्यास कचरतात. ज्या लोकांनी माझ्याबरोबर आधीच काम केले आहे त्यांना कोणतीही अडचण नाही, त्यांना माहित आहे की मी एक व्यावसायिक आहे... परंतु ज्या लोकांनी माझ्यासोबत काम केले नाही ते अजूनही अनिश्चित आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कसे करावे हे मला माहित नाही.'
मोनिका पुढे म्हणाली की, मी खूप लोकांना भेटत नाही, त्यामुळे तिला माझी बाजू मांडण्यासाठी खूप संधी मिळत नाहीत. मोनिकाने सांगितले की, केवळ कामच नाही तर तिच्या मला मुंबईत घर मिळणे कठीण झाले आहे.
मोनिका बिग बॉस आणि झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली आहे. संजय लीला भन्साळी निर्मित सरस्वतीचंद्र या टेलिव्हिजन शोमध्ये तिनं काम केले.