सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. बॉलिवूड कलाकारही दुर्गा देवीच्या चरणी नतमस्तक होत आहेत.
दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री काजोलनं तिच्या घरी दुर्गापूजेचं आयोजन केलं होतं. पूजेसाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली.
राणी मुखर्जी, जया बच्चन, रणवीर कपूर, मौनी रॉय असे अनेक कलाकर पूजेला आले होते.
दुर्गा पूजेच्या वेळी राणी आणि काजोल यांनी एकत्र फोटो क्लिक केले. दोघींचं बॉडिंग यावेळी दिसून आलं.
राणी आणि काजोल एकमेकांच्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे मैत्रिणींपेक्षा दोघी बहिणी म्हणून नेहमी एकत्र येत असतात.
अभिनेता रणवीर कपूरनं देखील दुर्गा देवीचे आशिर्वाद घेतले.
अभिनेत्री जया बच्चन देखील काजोलच्या घरी दुर्गा पूजेसाठी पोहचल्या.
रेड अँड व्हाइट रंगाच्या बंगाली साडीत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. जया बच्चन यांनीही राणी आणि काजोलबरोबर फोटो क्लिक केले.
अभिनेत्री तनीश मुखर्जीनं देखील काजोलच्या घरी जात देवीचे आशिर्वाद घेतले.
अभिनेत्री मौनी रॉय देखील साज शृंगार करत पूजेला आली होती.