NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अजय -काजोल नंतर कार्तिक आर्यनने घेतले आलिशान घर, किंमत वाचून डोक्याला लावाल हात

अजय -काजोल नंतर कार्तिक आर्यनने घेतले आलिशान घर, किंमत वाचून डोक्याला लावाल हात

कार्तिक आर्यन याने त्याच्या आई आणि चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. कार्तिकने पुन्हा एकदा स्वतःसाठी नवीन घर घेतल्याचे समोर आलं आहे.

17

कार्तिक आर्यनने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्याने 'प्यार का पंचनामा-2', 'भूल भुलैया-2', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'लुका-छिपी', 'पति पत्नी और वो' सारखे सुपरहिट चित्रपट दिले. सध्या कार्तिक त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

27

दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आई आणि चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. कार्तिकने पुन्हा एकदा स्वतःसाठी नवीन घर घेतल्याचे वृत्त आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. सोशल मीडियावर त्याच्या या नवीन घराची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

37

हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने पॉश एरिया जुहूमध्ये 1,594 स्क्वेअर फूटचा हा अपार्टमेंट 17.50 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. सिद्धीविनायक बिल्डिंगमध्ये त्याचे घर आहे. या कॅम्पसमध्ये 'प्रेसिडेन्सी सोसायटी' देखील आहे, जिथे कार्तिक आर्यनचे दुसरे घर आहे. या घरात कार्तिकचे कुटुंब म्हणजे त्याची आई डॉ. माला तिवारी या राहतात.

47

कार्तिकने हे घर 1.10 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने विकत घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या अपार्टमेंटसोबतच त्यांनी कार पार्किंगची जागाही घेतली आहे.

57

याआधी 2019 साली, कार्तिकने वर्सोवा येथे 459 चौरस फुटांच्या अपार्टमेंटमध्ये 1.60कोटींची गुंतवणूक केली होती. जेव्हा तो ग्वाल्हेरहून पहिल्यांदाच मुंबईत आला होता, तेव्हा तो याठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहिला होता.

67

अलीकडेच बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे अजय देवगण आणि काजोल यांनी आप्या प्रापर्टीमध्ये भर पडावी म्हणून 61 कोटी रुपये खर्च केले आहेत. अजयने स्वतःसाठी नवीन ऑफिस घेतले आहे, ज्याची किंमत 45 कोटी रुपये आहे. त्याचे कार्यालय अंधेरी पश्चिम, मुंबई येथे 13,293 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे. तर काजोलने 16.5 कोटी रुपयांचे घर घेतले आहे. जे 2,493 स्क्वेअर फूट कार्पेट एरियामध्ये आहेत. या अपार्टमेंटमध्ये 4 कार पार्किंग स्पॉट्स आहेत.

77

कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 9 दिवसांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 56 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

  • FIRST PUBLISHED :