बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.
या आनंदाच्या बातमीने चाहतेही खूप खूश आहेत आणि सोशल मीडियावर दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. चाहते बिपाशा आणि करणच्या लाडक्याच्या एका झलकची वाट पाहत आहेत.
आता या जोडप्याने मुलीच्या जन्मानंतर पहिली पोस्ट करत मुलीचं नाव सांगितलं आहे.
बिपाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळांच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. याला तिने आशीर्वाद असे कॅप्शन दिले आहे.
याबरोबर तिने १२-११-२२ असेही या फोटोवर लिहिले आहे. त्यात ती म्हणाली तुमच्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रत्यक्ष रुप इथे आहे. ते फारच सुंदर आहे.
त्याबरोबर तिने तिच्या लेकीचे नावही सांगितले आहे "देवी बसू सिंग ग्रोवर".
मुलीला देवीचा आशीर्वाद म्हणणाऱ्या बिपाशाने तिचे नावही 'देवी' असेच ठेवले आहे. मुलीचं नाव ऐकून चाहते आनंदी झाले आहेत.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची 'अलोन' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेट झाली होती आणि 2015 मध्ये एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, 2016 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती आणि आता दोघांनी मुलीचे स्वागत केले आहे.