तेजस्वी प्रकाश ही चाहत्यांची आवडती आणि छोट्या पडद्यावरील हायप्रोफाइल अभिनेत्री आहे. सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस जिंकणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आज घराघरात चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये भाग घेतला होता आणि ती या सीझनची विजेती देखील होती.
याशिवाय या शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतच्या रोमान्समुळेही ती चर्चेत होती.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने देशभरात खूप नाव कमावलं असलं तरी ही अभिनेत्री भारतीय रहिवासी नाही. ती यूएईची रहिवासी आहे हे फार कमी लोकांना माहित असेल.
बिग बॉस 15 दरम्यान, अभिनेत्रीने सांगितलं होतं की, ती 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतात राहू शकत नाही. अभिनेत्रीचा जन्म 10 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला होता आणि ती लहानाची मोठी देखील तिथेच झाली.
'बिग बॉस 15' ची विजेती झाल्यानंतर तिला 'नागिन 6' ची ऑफर आली आणि तिचं नशीब चमकलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' मधील प्रत्येक एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेते.
तसंच प्रत्येक सोशल मीडिया पोस्टसाठी तेजस्वी 10 ते 15 लाख रुपये कमावते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीची एकूण संपत्ती सुमारे 19 कोटी रुपये आहे.
तेजस्वी प्रकाश यांचे मुंबईपासून गोवा आणि दुबईपर्यंत स्वतःचे घर आहे. गेल्या वर्षीच तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत दुबईमध्ये एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते.