छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो बिग बॉस यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही झळकणार आहे. लवकरच त्याचा प्रिमियर होणार आहे. त्यासाठी आता काही स्पर्धक ठरले आहेत. पाहा कोण कोण दिसणार बिग बॉस ओटीटीच्या घरात.
Puncch Beat 2 फेम अभिनेत्री उर्फि जावेद (Urfi Javed) यावेळी ओटीटी वरील बिग बॉसमध्ये झळकणार आहे.
बडे भय्या की दुल्हनिया (Bade Bhaiyya Ki Dulhania), Bepannaah या मालिकांमध्येही दिसली होती.
कुमकुम भाग्य फेम झीशान खान देखील यावेळी बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता करण नाथ देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
करणने Mr India (1987) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरूवात केली होती. नंतर तो पागलपण या चित्रपटात दिसला.
गायिका नेहा भसिन देखील बिग बॉस ओटीटीच्या घरात दिसणार आहे.
दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यावेळी बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे.