‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) मध्ये नवनवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. तर शमिता शेट्टी आणि राकेश बापटची केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात १७ व्या दिवशी राकेश बापटने शमिता शेट्टीला मॉर्निंग किस देत साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं
मागील दिवशी अक्षर सिंग इमोशनल झालेली पाहायला मिळाली.
पण निशांत भट्ट आणि मुस्कान जट्टानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची मातमी आहे.
बिग बॉस घराचे बॉस मॅन आणि बॉस लेडी झीशान खान आणि दिव्या अग्रवालने मुस्कान आणि निशांतला नॉमिनेट केलं होतं.
पण हा निर्ण शमिता आणि राकेशला फारसा आवडला नाही.
त्यामुळे यावेळी बेघर होण्यासाठी नॉमिनेट झालेल्या जोड्या, प्रतीक-नेहा, शमिता-राकेश आणि मिलिंद-अक्षरा या आहेत.
पण बिग बॉसच्या घरात काहीही घडू शकतं. नॉमिनेशन नंतर पुन्हा एक ट्वीस्ट आला आहे.
कारण यावेळी प्रेक्षकांच्या हातात ताकद आहे. त्यामुळे प्रेक्षक एका नॉमिनेटेड जोडीला वाचवू शकतात.