NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी मध्ये धमाकेदार एंट्री घेणार आलिया भट्टची बहिण? यामुळं चर्चेत आहे अभिनेत्रीचं नाव

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी मध्ये धमाकेदार एंट्री घेणार आलिया भट्टची बहिण? यामुळं चर्चेत आहे अभिनेत्रीचं नाव

सलमान खानचा बिग बँग शो 'बिग बॉस ओटीटी 2' च्या प्रीमियरला थोडाच वेळ शिल्लक आहे. आज रात्री हा शो Jio सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये अनेक सहभागी प्रेक्षकांची नावे समोर आली आहेत. आता त्यात अजून एकाची भर पडली आहे. ही स्पर्धक दुसरी कोणी नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

18

सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' च्या 13व्या स्पर्धकाचे नाव आहे पूजा भट्ट, जी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि आलिया भट्टची बहीण आहे.

28

मीडिया रिपोर्टनुसार पूजा भट्टबद्दल बातमी आहे की ती आज रात्री या शोमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. पूजा भट्ट किंवा 'बिग बॉस ओटीटी 2' च्या निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही.

38

पूजा भट्टचे नाव समोर आल्यानंतर 'बिग बॉस ओटीटी 2' चे प्रेक्षकही उत्साहित झाले आहेत.

48

पूजा भट्ट तिच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक वेळा ही अभिनेत्री सरकारवर निशाणा साधत असते.

58

पूजा भट्ट अनेकदा वादात देखील सापडते. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये देखील पूजा राडा करणार यात शंका नाही.

68

पूजा भट्टच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर ती अलीकडेच बॉम्बे बेगम या वेब सिरीजमध्ये झळकली होती. तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं होतं.

78

आता 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये पूजा कशी सहभागी होणार, टास्क कसे खेळणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

88

जिओ सिनेमाच्या ट्विटनुसार, 'बिग बॉस OTT 2' चा प्रीमियर आज रात्री 9 वाजता होणार आहे. प्रेक्षक Jio Cinema App वर याचा मोफत आनंद घेऊ शकतात. 'बिग बॉस OTT 2' ची सुरुवात सलमान खानच्या ढासू एंट्रीने होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :