'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
समोर आलेल्या अपडेटमध्ये राखी सावंत ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे..
राखी नंतर आता कोल्हापूरची लवंगी मिरची अमृता धोंगडेंचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.
आता अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि अक्षय केळकर हे टॉप ३ स्पर्धक आहेत.
तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत.
यंदाच्या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
अमृता साठी कोल्हापुरात पोस्टरबाजी करण्यात आली होती.
आता ती बाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
एवढ्या शेवटी येऊन बाहेर पडताना अमृता चांगलीच इमोशनल झाली होती.