NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mira Jagannath : बिग बॉस मधून बाहेर पडताच मीरा जगन्नाथने स्वतःसाठी खरेदी केली 'ही' गोष्ट; सोशल मीडियावर एकच चर्चा

Mira Jagannath : बिग बॉस मधून बाहेर पडताच मीरा जगन्नाथने स्वतःसाठी खरेदी केली 'ही' गोष्ट; सोशल मीडियावर एकच चर्चा

मालिकांमधल्या भूमिकांपेक्षा रिअॅलिटी शोमधून चाहत्यांसमोर येत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे मीरा जगन्नाथ. ‘बिग बॉस’ मराठी' मुळे लोकप्रिय झालेल्या यंदाच्या सीझनमध्ये मीराने पुन्हा एकदा घर गाजवलं. आता एका आठ्वड्यासाठी घरात गेलेल्या मीराने बाहेर येताच अशी गोष्ट केली आहे ज्यामुळे चाहते तिचं कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काय आहे ती गोष्ट पाहा...

18

मालिकांमधल्या भूमिकांपेक्षा रिअॅलिटी शोमधून चाहत्यांसमोर येत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे मीरा जगन्नाथ.

28

‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ या नावाला आणि माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली, यापूर्वी एवढी भांडणं करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती, मात्र संवाद गरजेचा असतो. मी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करू शकते, मी कणखर मुलगी आहे याची जाणीव मला तिथं झाली,’ असं मीरा सांगते.

38

यंदाच्या सीझनमध्येही मीरा जगन्नाथने ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात हजेरी लावली होती. मागच्या आठवड्यात मीरा जगन्नाथ आणि विशाल निकम घरातून बाहेर पडले.

48

आता घरातून बाहेर पडताच मीराने आयुष्यातील पहिली वहिली गाडी खरेदी केली आहे.

58

तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

68

गाडी सोबतचे फोटो शेअर करत मीराने लिहिलंय कि, ''दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, घरच्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे, माझं पहिलं वाहन घेत आहे!''

78

तिच्या या पोस्टवर चाहते आता शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

88

अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता आपल्याला एक नव्या रूपात दिसणार आहे. स्टार प्रवाहावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मीरा साक्षी ही खालनायिकेची भूमिका साकारणार आहे.

  • FIRST PUBLISHED :