बिग बॉस प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात.
सुरेखा सध्या त्यांच्या फिटनेसवर विशेष लक्ष देताना दिसत आहेत.
अनेक ठिकाणच्या दौऱ्यांचे फोटो त्या शेअर करत असतात.
सुरेखानी नुकतीच त्यांच्या जिवलग माणसांची भेट घेतली. त्यावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
सुरेखा यांनी त्यांच्या जवळच्या मित्र मैत्रिणींबरोबर छोटसं गेट टुगेदर केलं.
यात त्यांची खास मैत्रिण आणि सहअभिनेत्री प्रिया बेर्डे देखील होत्या. दोघींना अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.
सगळ्यांची भेट घेतल्यानं सुरेखा फारच खुश होत्या. मित्रांसाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली.
त्यांनी म्हटलं, 'आज काही खास आणि जवळच्या लोकांसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही. जीवाला जीव देणारी माणसं. स्वतः सगळं करून दुसऱ्यांना मोठे करणारे'. या पोस्टमधून त्यांनी मित्रांसाठी प्रेम व्यक्त केलं आहे.
गप्पा,जेवण, आणि गॉसिप्स करत सुरेखा यांनी दिवस एन्जॉय केला.