बिग बॉस मराठी रियालिटी शो त्याच्या वादांसाठी प्रसिद्ध आहे. शोचे मागील तीन सीझन खूप यशस्वी झाले कारण ते वाद, अटक आणि मारामारीने भरलेले होते.
राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांनी त्यांच्या नात्याने शोमध्ये प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या अत्यंत जवळीकतेमुळे खूप चर्चा झाल्या. सगळ्यात जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा राजेशने कॅमेऱ्यासमोर येऊन रेशमवर प्रेम असल्याची कबुली त्याच्या पत्नीला दिली होती.
बिग बॉस मराठी 2 मध्ये, स्पर्धक अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स केल्याप्रकरणी घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने बिचुकले यांना मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये असलेल्या बीबी मराठी घराच्या सेटवरून उचलले आणि काही दिवस त्यांची चौकशी केली. बिचुकले यांनी नंतर शोमध्ये पुन्हा प्रवेश केला.
'पाणी वाचवा' टास्क दरम्यान ऋतुजा धर्माधिकारी आणि राजेश शृंगारपुरे यांनी जोरदार भांडण केले. त्यात ऋतुजाच्या पाठीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आणि तिला उपचारासाठी बिग बॉसचे घर सोडावे लागले होते.
बिग बॉस मराठी 2 ची स्पर्धक शिवानी सुर्वे हिने घरात अनेक वाद निर्माण केले. शिवानीला नंतर घरात अस्वस्थ वाटू लागले आणि तिने बिग बॉसला तिला जाऊ देण्याची विनंती केली. होस्ट महेश मांजरेकर यांनी शिवानीला क्रायबॅबी म्हटले आणि वीकेंडला लगेच शो सोडण्यास सांगितले. महेशच्या अनपेक्षित निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला.
स्नेहा वाघने आणि तिचा माजी पती आविष्कार दारव्हेकर यांची बिग बॉसच्या घरात चांगलीच चर्चा रंगली होती. आविष्कारला घरात पाहून स्नेहाला धक्काच बसला. या माजी जोडप्याने शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला.
बिग बॉस मराठीच्या सीझन 3 मध्ये, विशाल निकम आणि सोनाली पाटील यांच्यात वीकेंड चावडी एपिसोडमध्ये भांडण झाले होते. विशालने सोनालीवर गंभीर आरोप केले होते. त्याने सोनालीवर ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे असे गंभीर आरोप करत तिला व्यसन असल्याचे सांगितले होते. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.
बिग बॉस च्या घरातून शेफ पराग कान्हेरे याला बाहेर काढण्यात आले होते. कारण टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानशीलात लगावली होती. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता.