बिग बॉस मराठीच्या घरात शेवटी तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे प्रत्येक सदस्याला वाटत असते. पण आज घरातून तिसरा स्पर्धक एक्झिट घेणार आहे.
मागच्या आठवड्यात त्याच्यावर मेघा घाडगेने घराबाहेर पडताच आरोप केले आहेत.
तसंच या आठवड्यात देखील त्याने इतर स्पर्धकांशी पंगा घेतला.
योगेशने मेघा घाडगेसोबत इतर स्पर्धकांना असभ्य भाषेत भांडण केले होते.
तेच योगेशला भोवणार असून योगेश जाधव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.
विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये आले ज्यामधून योगेश जाधवला घर सोडावे लागले.
तर त्याचबरोबर आज घरामध्ये या सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री स्नेहलता वसईकरने घेतली आहे.
आता स्नेहलता बिग बॉसचं घर कसं गजणवणार याकडे चाहत्यांचे डोळे आहेत. म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हाात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.