बिग बॉस मराठी 4 मधून सगळ्यांची लाडकी स्पर्धक अर्थाच तेजस्विनी लोणारी घरातून बाहेर आली आहे.
टास्क दरम्यान तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं तिला शारिरीकदृष्ट्या कमजोर असल्या कारणानं तिला बिग बॉसनं घराबाहेर जाण्याचे आदेश दिले.
तेजस्विनीनं घराबाहेर पडणं हे कोणालाचं मान्य नव्हतं. सगळे स्पर्धक तेजस्विनीला निरोप देताना ढसाढसा रडले.
घराबाहेर आल्यानंतर तेजस्विनी डॉक्टरांकडे गेली. तिच्या डॉक्टरांनी तिच्या हाताची ट्रिटमेंट सुरू केली असून महत्त्वाची अपडेट तिला दिली आहे.
तेजस्विनीच्या हाताची दुखापत ही साधी सुधी नाहीये. तिनं पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
तेजस्विनीनं सांगितलं की, 'डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्या हाताची दुखापत पाहिली तेव्हा त्यांनी सांगितलं की ही साधी सुधी दुखापत नाही'.
'अशा पद्धतीची दुखापत ही शक्यतो कुस्ती, MMA किंवा धरपकड करणाऱ्या खेळात होते'.
'या खेळाच्या ट्रेनिंग वेळीच खेळाडूंना अशी इजा समोरच्याला होणार नाही याची काळजी घ्या असं सांगितलेलं असतं', असं तेजस्विनी म्हणाली.
त्याचप्रमाणे तेजस्विनी म्हणाली, 'माझ्या बाबतीत मला थोडी सावधगिरी बाळगायला हवी होती असं आता वाटतं आहे'.
'पण हा खेळ आहे कधी काय कसे होईल काहीच सांगू शकत नाही', असं तेजस्विनी म्हणाली.