बिग बॉसची चावडी चांगलीच रंगली. बिग बॉसने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सदस्यांना धक्का बसला. कालच्या यशश्रीच्या एक्सिटनंतर सदस्यांचे टेन्शन वाढले.
काल जवळपास ४९ दिवसाच्या प्रवासानंतर यशश्रीला घराबाहेर पडावे लागले. कोणता सदस्य चांगला खेळला, कोण चुकलं, कोणी टास्क उत्तमरीत्या पार पाडला या सगळ्याचा हिशोब सरांनी चावडीवर घेतला. तर अमृता धोंगडेला देखील सरांनी सुनावले.
अपूर्वा आणि किरण माने यांच्यात शाब्दिक बाचाबाची बघायला मिळाली. किरण माने म्हणाले, ‘एक वाक्य खूप छान होतं अपूर्वाचं की अमृता बिग बॉसला खूप हलक्यात घेतेय ' ज्यावर अपूर्वाचे म्हणणे होते मी असं काहीही बोले नाही, खोटारडा माणूस आहेस तू.
किरण मानेचे म्हणणे आहे प्रोजेक्शनच्या नावाखाली आक्रस्थाळेपणा करू नको. हिडीस दिसतं ते. अपूर्वा यावर म्हणाली, हिडीस काय दिसते ते मी बघून घेईन तू कसा दिसतो ते बघ...
तर दुसरीकडे सदस्यांना घरातील आठवणी shrade करायला सांगितल्या. याचसोबत VOOT आरोपी कोण मध्ये या आठवड्यातील आरोपी अपूर्वा नेमळेकर ठरली. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथ मध्ये विकासला अमृता धोंगडेची चुगली त्याविषयी विकासने तिला स्पष्टीकरण देखील दिले.
या सगळ्यानंतर तो कठीण क्षण आला ज्यामध्ये घरामधून बाहेर पडणार होता दुसरा सदस्य. आणि त्यासाठी खुद्द महेश मांजरेकर घरामध्ये गेले. किरण माने यांना घराबाहेर पडावे लागले असे सांगण्यात आले.
पण महेश सरांनी जाहीर केले किरण माने यांचे eviction झाले नाहीये. तसेच बिग बॉस यांनी किरण माने यांना सांगितले तुम्ही घरातून बाहेर पडलला असला तरीदेखील खेळातून बाहेर नाही पडलात.
आता बघूया किरण माने यांना कोणती विशेष पॉवर दिली असेल ? काय घडेल पुढे? किरण माने यांची एंट्री सिक्रेट रुममध्ये झाली. या सिक्रेट रुम मधून किरण माने सर्व सदस्यांचा गेम, बातचीत, संवाद यावर नजर ठेऊ शकणार आहेत. या पुढचा खेळ अजून रंजक होणार यात शंका नाही.