बिग बॉस मराठी 4 ची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते.
चौथ्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी एंट्री केली. एकाहून एक तगडे स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले.
मात्र बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या तितकासा पचनी पडला नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र तरीही प्रेक्षक शो आवर्जुन पाहताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन अखेर प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे.
एकामागून एक स्पर्धक घराचा निरोप घेत आहेत. आता घरात किरण माने, प्रसाद जवादे अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत.
घरातील 76वा दिवस पार पडला आहे. त्यामुळे केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे.
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बिग बॉस मराठी 4 प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीनं अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
घरातून बाहेर गेलेल्या सदस्यांबरोबर बिग बॉस अनफेअर वागल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे यांनी जिंकावं अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.
तसंच राखी सावंतला बिग बॉस मराठीचा तरी विनर करा अशी मागणी करण्यात येत आहे.