मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'कलावती' या सिनेमात अमृता खानविलकर झळकणार आहे.
अमृता सोबतच या चित्रपटात बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झालेली एक प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सिझन गाजवलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच 'कलावती' या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी तेजस्विनीने खास उपस्थिती दर्शवली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.
या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी पोस्टरवरून 'कलावती' ची कथा आणि अमृताची भूमिका चंद्रमुखी सारखीच असेल असा अंदाज आहे. त्यामुळे या चित्रपटात अमृता आणि तेजस्विनी मध्ये नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार का हे बघणं महत्वाचं आहे.
आजपर्यंत छोट्या पडद्यावर काम केलेल्या तेजस्विनीला या चित्रपटात मोठी संधी मिळाली आहे.
तेजस्विनीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.