अपूर्वा नेमळेकरच्या खाजगी आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते.
अपूर्वाचं आजवरचं आयुष्य सोपं नव्हतं. तिला आयुष्यात अनेकदा वाईट काळाचा सामना करावा लागला आहे.
नुकतंच अपूर्वाच्या सक्ख्या भावाचं अकाली निधन झालं आहे. त्यामुळे तिच्या खाजगी आयुष्यात मोठं वादळ आलं आहे.
बिग बॉसच्या घरात तिने आपल्या आयुष्यातील मोठ्या दुःखाचा उलगडा केला होता.
राखीशी बोलताना तिने तिचं दुःख व्यक्त केलं होतं. यावेळी ती म्हणाली होती कि, ''मला जे द्यायचं नव्हतं, जे आयुष्यभर उराशी कवटाळून ठेवायचं होतं ते सुद्धा गमावलंय मी.' एवढं बोलताच अपूर्वाला अश्रू अनावर झाले होते.
अपूर्वाच्या वडिलांचं देखील निधन झालं आहे. हा काळ तिच्यासाठी सोप्पा नव्हता.
अपूर्वाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती रोहन देशपांडेसोबत विवाहबंधानात अडकली होती. पारंपरिक पद्धतीनं मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघेही वेगळे झाले.
अपूर्वा तिचा भाऊ आणि आईसोबत राहत होती. पण भावाचं अवघ्या 28 व्या वर्षी निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.