बिग बॉस मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्या खाजगी आयुष्यात तिने खूप धक्के सोसले आहेत.
अपूर्वा नेमळेकरच्या भावाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
अपूर्वाचा भाऊ फक्त 28 वर्षांचा होता. अपूर्वाने भावासाठी एक दुःखद पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वाच्या भावाचं ओंकार नेमळेकरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे. अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली आहे.
अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटलंय कि, 'माझा प्रिय भाऊ, शांतपणे विश्रांती घे. आयुष्यात कधी कधी नुकसान होते. ते असं असत कि कधीही बदलले जाऊ शकत नाहीत. तुला गमावणे ही मला जगण्याची सर्वात कठीण गोष्ट आहे.'
तिने पुढे म्हटलंय कि, 'मी तुझा निरोप घ्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायला तयार नव्हते. मी आणखी एका दिवसासाठी काहीही करायला तयार आहे, फक्त एक सेकंद. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाही.'
'काही बंध तोडता येत नाहीत. मी कायम माझ्यासोबत ठेवीन, कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस. माझ्या बाळा तुला लवकरच भेटेन.' अशा भावना अपूर्वाने व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वाची ही पोस्ट वाचून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला असून तिचे मित्र आणि सहकलाकार तिला धीर देत आहेत.
अपूर्वाच्या वडिलांचं आधीच निधन झालं असून ती आई आणि भावासोबत राहत होती. आता भावाच्या अचानक जाण्याने अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.