'बिग बॉस मराठी सीझन 4' सुरु झाला आहे. 2 ऑक्टोबरपासून सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरातील सदस्यांमध्ये खूप वाद-विवाद होत आहे. सोबतच मस्तीही पहायला मिळतेय.
आठवड्याभरानंतर बिग बॉसच्या चावडीवर शनिवारी आणि रविवारी महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली.
यामध्ये प्रामुख्याने अपूर्वा नेमळेकर हिच्या खेळाबद्दल मांजरेकरांनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मज्जा मस्ती देखील बघायला मिळणार आहे.
आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत.
नेहमी सगळ्यांवर चिडणारी अपूर्वा तिचं घरातल्या सदस्यांनी नामकरण केलय. तिला चक्क कानफाट्या असं नाव ठेवलय.
झालं असं रोहितने समृद्धीला विचारले तुझा आज बुबू बघितला नाही... त्यावर समृद्धीचे म्हणणे पडले, त्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे त्याला अपूर्वाची नजर लागली आहे, सारखी चिमटे काढत असते त्याला.
त्यावर अपूर्वा म्हणाली, "झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेट वरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरचं येते आहे”.
त्यामुळे सगळ्यांवर नेहमी हक्क गाजवणाऱ्या अपूर्वाला स्वतःलाच कानफाट्या म्हणून घेण्याची वेळ का आली ते आजच्या भागामध्ये समजणार आहे.