NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss च्या घरात शाब्दिक युद्ध; किरण मानेंचा तेजस्विनीला सल्ला, म्हणाले तुला...

Bigg Boss च्या घरात शाब्दिक युद्ध; किरण मानेंचा तेजस्विनीला सल्ला, म्हणाले तुला...

बिग बॉस मराठीच्या घरात तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी कार्य पार पडणार आहे. या कार्यात किरण माने आणि तेजस्विनी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळेल.

19

बिग बॉसने सदस्यांवर रोख ठोक हे कार्य सोपवलं आहे. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हे कार्य रंगणार आहे.

29

या टास्कमध्ये आज शाब्दिक युद्ध रंगणार आहे. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत.

39

उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज असणार आहे कॅप्टन रोहित शिंदे.

49

यावेळी तेजस्विनी लोणारी हिला कॅप्टन बनवण्यासाठी किरण माने यांचा विरोध आहे. त्यासाठी ते तिला शाब्दिक सल्ला देताना दिसणार आहेत.

59

किरण माने यांचे म्हणणे आहे, "ज्यावेळेस चांगली माणसं आपल्यापासून तुटतात आणि आपल्या ग्रुपमध्ये वादंग निर्माण करणारी, गढूळता निर्माण करणारी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे".

69

"निर्णय क्षमता नसल्याने तुमच्यापासून माणसं तुटतात. मॅडमना (तेजस्विनीला) असं वाटतं कि, बिग बॉस हा गेम फक्त शक्तीचा आहे... पण हा गेम शक्तीचा नसून तितकाच युक्तीचा, बुद्धीचा देखील आहे".

79

"युक्ती पण येऊ देत तुमच्याकडे. चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा म्हातारा माणूस येऊ देत तुमच्याकडे. पण त्यांना युक्ती अत्यंत फालतू वाटली आणि म्हणनूच त्यांनी युक्तीची दोन माणसं काढून टाकली", असं किरण माने म्हणाले.

89

किरण माने पुढे म्हणाले, "दोन माणसं काढल्यानं एक कन्फ्युजिंग माणूस घेतला. हा lack of decision मेकिंग आहे असं मला वाटतं"

99

आता या सगळ्यावर तेजस्विनीचं काय उत्तर असणार आहे हे आजच्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.

  • FIRST PUBLISHED :