राखी आणि आरोह वाईल्ड कार्ड चॅलेंजर्स म्हणून घरात आले होते. त्यापैकी या आठवड्यात आरोह वेलणकरला घराचा निरोप घ्यावा लागला.
स्ट्रॅटेजीच्या जोरावर उत्तम खेळी करत आरोह खेळात टिकून राहिला. परंतु, अखेर खेळातून बाहेर पडावं लागल्याने त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.
घरातून बाहेर पडताच आरोहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलेल्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
''मी बाहेर आलोय, पण तुम्ही माझ्या मनात कायम राहाल'' असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्याचबरोबर तो म्हणतोय कि, 'बिग बॉस सीजन ४ चा हा अविस्मरणीय प्रवास माझ्या कायम लक्षात राहील. माझ्या वर भरभरून प्रेम केल्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. बिग बॉसने माझ्या वर पुन्हा एकदा विश्वास दाखवत चॅलेंजर्स म्हणून माझी निवड केली होती त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद..!'
आरोह वेलणकर बिग बॉसच्या सिझन 2 चा स्पर्धक होता. त्यावेळी देखील त्याला असंच घरातून बाहेर पडावे लागले होते.
या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या आरोहकडे अनेक जण टॉप 5 मधला स्पर्धक म्हणून बघत असताना तो काल घराबाहेर पडला आहे.
आता आरोहच्या एव्हिक्शनने त्याचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.