NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg boss marathi 4: 'मी कट्टर आहे'; पुन्हा कशावरुन पेटली अपूर्वा?

Bigg boss marathi 4: 'मी कट्टर आहे'; पुन्हा कशावरुन पेटली अपूर्वा?

बिग बॉस मराठीच्या घरात एक स्पर्धक कायम चर्चेत राहते ती म्हणजे अपूर्वा नेमळेकर. मागच्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली. तरीही या आठ्वड्यात सुद्धा तिचा आवाज काही कमी नाही. या आठ्वड्यात देखील तिने किरण माने,विकास सावंत यांच्यावर आवाज चढवला. आता सुद्धा ती चर्चेत आलीये. नक्की काय आहे कारण बघा.

18

बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक कायम चर्चेत राहते ती म्हणजे अपूर्वा नेमळेकर. मागच्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली.

28

तरीही या आठ्वड्यात सुद्धा तिचा आवाज काही कमी नाही. या आठ्वड्यात देखील तिने किरण माने,विकास सावंत यांच्यावर आवाज चढवला. आता नक्की काय झालं बघा.

38

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या सुरू आहे. घरातील पहिला आठवडा स्पर्धकांच्या आरडा ओरड्यानं चांगलाच गाजला. या आठवड्यात थोड खेळीमेळीचं वातावरण घरात आहे. पण स्पर्धकांमध्ये छोटे मोठे वाद चालूच असतात.

48

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे.

58

अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, "त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते कि आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत...

68

ती पुढे रुचिराला म्हणाली, '' मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. आणि हि तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे...''

78

घरात कॅप्टन्सी टास्क रंगला तेव्हा अपूर्वा आणि समृद्धी अक्षयकडून खेळात होत्या. त्यावरून ती पुढे म्हणाली कि, ' "मी कट्टर आहे" आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील.''

88

ती म्हणाली कि, '' मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन". आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे ते आजच्या भागामध्ये कळेल.

  • FIRST PUBLISHED :