NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लग्नाआधीच दिलेला मुलीला जन्म; वादग्रस्त राहिलं बिग बॉस मराठीच्या पहिल्या विजेतीचं खासगी आयुष्य

लग्नाआधीच दिलेला मुलीला जन्म; वादग्रस्त राहिलं बिग बॉस मराठीच्या पहिल्या विजेतीचं खासगी आयुष्य

HBD Megha Dhade: बिग बॉस मराठीची पहिल्या सिझनची विजेती म्हणून अभिनेत्री मेघा धाडेला ओळखलं जातं. मराठीनंतर बिग बॉस 12 च्या घरात वाइल्डकार्ड एंट्री घेत मेघाने सगळ्यांनाच चकित केलं होतं. करिअरमध्ये जरी मेघाने यश मिळवलं असलं तरी तिचं खाजगी आयुष्य खूपच संकटांनी भरलेलं होतं. आज मेघाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्याची गोष्ट.

18

मेघा मूळची जळगावची असून तिने तिच्या शालेय जीवनापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती जिथे ती नाटकांमध्ये काम करायची. पण तिचे आई-वडील तिच्या अभिनय करण्याच्या विरोधात होते.

28

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तिला घरातील अनेक बंधनांना सामोरे जावे लागले. पण तिचा खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला जेव्हा ती लग्नाआधी गरोदर राहिली. त्या वेळी ती फक्त 15-16 वर्षांची होती.

38

मेघा लग्नापूर्वीच आई झाली होती. तिच्या मुलीचे नाव साक्षी आहे. मेघा 15-16 वर्षांची असताना तिचे जळगावस्थित एका तरुणासोबत प्रेम जुळले होते. त्यातूनच ती प्रेग्नेंट झाली.

48

पाच महिने उलटून गेल्यानंतर मेघाला ती प्रेग्नेंट असल्याचे समजले होते. आईवडील, भाऊ, समाजाच्या विरोधात जाऊन मुलीला जन्म दिल्याचे मेघाने सांगितले. मेघाच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून तिच्या वडिलांचा चार महिन्यातच मृत्यू झाला होता.

58

त्यानंतर मेघा तीन वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण त्याच्या अतिपझेसिव्हनेसला ती कंटाळली होती. त्यातून सतत त्यांचे खटके उडायचे आणि म्हणूनच तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

68

दोन ब्रेकअपनंतर अखेर मेघाला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. काही वर्षांपूर्वी मेघाने आदित्य पावस्कर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले.

78

मेघाने बिग बॉसच्या घरात तिच्या पतीचा उल्लेख करताना सांगितले होते, 'लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या. लग्नाच्या आधीच मी आई झाल्यानंतर माझं आयुष्य खूपच खडतर होत गेलं. या सर्व घटनेमुळं घरच्यांनी देखील मला लांब केलं होतं.'

88

मेघाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या, पण तिने न खचता करिअरवर लक्ष दिलं. दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना ती म्हणाली होती कि, 'मी कधी लग्न करेन असे मला वाटलही नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी मी लग्न केलं. माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट आहेत. माझ्या पतीचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्यांना 15 वर्षांचा एक मुलगा आहे.'

  • FIRST PUBLISHED :