बिग बॉस 16 ची सुरुवात 17 स्पर्धकांनी झाली होती. या मध्ये एक सो एक तगड्या स्पर्धकांचा समावेश होता.
पण शेवटी घरात फक्त टॉप-5 स्पर्धक घरात उरले होते. यामध्ये प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम यांचा समावेश होता.
मात्र यापैकी कोण विजेता ठरणार, मनी बॅगसह अंतिम फेरीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडणार आणि टॉप-3मध्ये कोण पोहोचणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
ग्रँड फिनाले सुरु होताच शालीन भानोतला घराचा निरोप घ्यावा लागला.
त्यानंतर अर्चना गौतमने देखील लवकरच घराचा निरोप घेतला.
ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टेन यांच्यात चुरशीची लढत होती.
अखेर टॉप २ मध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टेन होते.
अखेर रॅपर एमसी स्टेन बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता ठरला तर शिव ठाकरे फर्स्ट रनरअपचा मान पटकावला.