सलमान खानच्या शोमधील शिव ठाकरे सध्या खूप चर्चेत आहे.
शिव ठाकरेने बिग बॉसचं विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं आहे.
दरम्यान, शिव ठाकरे यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. जे कळल्यानंतर शिव ठाकरेंच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.
शिव ठाकरे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो सतत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत लाईफ अपडेट्स शेअर करतो.
नुकतंच शिव ठाकरेने लाईव्ह येत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे.
या लाईव्ह दरम्यान शिवने लवकरच तो बड्या स्टारसह सिनेमात झळकणार असल्याची घोषणा केली आहे.
याबद्दल बोलताना शिव म्हणाला, 'लवकरच मी 'खतरो के खिलाडी' मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे पण त्याविषयी फायनल बोलणं अजून बाकी आहे. तसंच एका बड्या स्टार सोबत एका चित्रपटाची बोलणी झाली आहे. लवकरच पुढील माहिती शेअर करेन.'
मध्यंतरी शिव ठाकरे सलमान खानच्या चित्रपटात झळकणार अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे शिवने सांगितलेला हा बडा स्टार सलमान खानचं आहे का हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे,