शालिन भनौत बिग बॉस 16 च्या घरातील गाजलेला स्पर्धक आहे. शेवट्पर्यंत तो चांगला खेळाला.
पण तो या घरात असतानाच त्याच्या माजी बायकोने दुसऱ्या लग्नाची घोषणा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ती लग्नानंतर मुलासोबत दुसऱ्या देशात स्थायिक होणार आहे.
आता शालिन रिअॅलिटी शोमधून बाहेर पडला असून, त्याने आपल्या माजी पत्नीच्या निर्णयावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
शालिन भानोतने नुकत्याच एका मुलाखतीत दलजीतच्या या निर्णयावर तो खूप आनंदी असल्याचं सांगितलं आहे. याविषयी तो म्हणाला की “मला अजून तिला भेटायचे आहे आणि तिच्याशी बोलायचे आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे.'
पुढे तो म्हणाला कि, 'लोकांनी आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे, सगळ्यांनी जीवनाला आणखी एक संधी दिली पाहिजे. काही ऍडजस्टमेंट करणे आवश्यक आहे आणि ते ठीक आहे.'
तसेच यावेळी त्याला भविष्यात तो दुसरं लग्न करणार का असेही विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला कि, 'माझं सध्या माझ्या आई-वडील आणि भावंडांवर प्रेम आहे. मी स्वत:ला आणखी एक संधी देत आहे…पण स्वत:सोबतच मी आनंदी आहे'.
शालिनचं हे उत्तर ऐकून चाहते त्याच कौतुक करत आहेत.
शालीन आणि दलजीत कौरने डिसेंबर 2009 मध्ये लग्न केले होते पण 2016 मध्ये ते वेगळे झाले. त्यांना जेडोन नावाचा एक मुलगा देखील आहे.