NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss 15: अभिजित बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा; घरात उडाला एकच गोंधळ

Bigg Boss 15: अभिजित बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा; घरात उडाला एकच गोंधळ

अभिजीत बिचुकलेने देवोलीना बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळं शोमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.देवोलिना अभिजीत बिचुकलेवर ओरडते आणि म्हणते, 'सीमारेषा ओलांडू नकोस'. या दोघांमध्ये आता जोरदार भांडणं होत असून अभिजीत बिचकुले आपल्या कमेंट्समुळं अडचणीत आला आहे.

15

कलर्सच्या 'बिग बॉस 15' मध्ये कन्टेस्टंट फिनाले मध्ये प्रवेश करण्यासाठी संधी शोधत आहेत. देवोलीना, प्रतीक, रश्मी आणि शमिता कालच्या टास्कचे विजेते म्हणून कसे उदयास आलेले आहेत. त्यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर या चौघांना आज रात्रीच्या 'म्युझियम टास्क' मध्ये एक फायदा देण्यात आला आहे. त्यांना शक्य तितक्या प्राचीन वस्तू लुटून घ्यायच्या आहेत. जो सर्वाधिक चोरी करण्यात यशस्वी होईल तो या हंगामातील दुसरा अंतिम फेरीचा खेळाडू होईल.

25

अभिजीत गुपचूप एक कलाकृती चोरतो, पण निशांत त्यांना असे करताना पकडतो. त्यानंतर निशांत 'तुम्ही गार्ड आहात, चोरी करू नका', असे म्हणत त्यांच्यावर ओरडतो. त्याचवेळी रश्मी काही वस्तू चोरते आणि शमिताने मॅनेजर राखी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यावर रश्मी म्हणते, 'मी एकही वस्तू चोरलेली नाही'.

35

दुसरीकडे रितेश उमरला अनेक वस्तू लुटताना पकडतो आणि ओरडतो, 'इथलं सर्व सामान चोरी झालेलं आहे', राजीवसोबत डोकं लावत असताना रितेश ही कलाकृती चोरायला लागतो. नियम पाळले नाहीत तर घरात गोंधळ उडतो. रश्मी राखीला म्हणते, ''तु सांगितलं आहे ना की तु इमानदार राहशील? सगळे चोरत आहेत!', राखीने पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि निर्दयपणे मागणी केली, 'ज्यांनी ज्यांनी चोरी केलेली आहे, त्यांनी ते परत करायला हवं'.

45

दरम्यान अभिजीत बिचुकलेने देवोलीनावर देवोलीना बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळं शो मध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळं देवोलिना त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, 'सीमारेषा ओलांडू नकोस'. या दोघांमध्ये आता जोरदार भांडणं होत असून अभिजीत बिचकुले आपल्या कमेंट्समुळं अडचणीत आला आहे.

55

त्याच वेळी देवोलीना रागाने त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, कितीवेळा मी सांगितलं आहे की तू माझ्याबरोबर बोलताना सीमा ओलांडणार नाहीस, जर तुम्ही माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही', अभिजीत देवोलीनाला ब्लॅकमेल करत असल्याचं ऐकून तेजस्वीचा धीर सुटला आणि म्हणाली, 'मी आता त्याच्या कानशिलात लगावणार आहे', रागाच्या भरात ती अभिजीतच्या दिशेनं सरसावते.

  • FIRST PUBLISHED :