NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bollywood Actors: बिग बी ते कॅटरिना 'या' कलाकारांना करिअरमधल्या एका चुकीचा होतो अजूनही पश्चाताप

Bollywood Actors: बिग बी ते कॅटरिना 'या' कलाकारांना करिअरमधल्या एका चुकीचा होतो अजूनही पश्चाताप

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी खूप कठीण परिस्थितीतून यश मिळवलं आहे. ते आज यशाच्या शिखरावर असले तरी पण त्यांच्या सुद्धा करिअरमध्ये आजपर्यंत अनेक चुका झाल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी आपल्या करिअरमध्ये चुका झाल्याचं उघडपणे मान्य करतात. त्यांना आजही या चुकांचा पश्चाताप होतो. जाणून घ्या कोण आहेत असे कलाकार.

18

बॉलीवूड कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात. पण प्रत्येक वेळी असे होत नाही. अनेक सेलिब्रिटी आपल्या करिअरमध्ये चुका झाल्याचं उघडपणे मान्य करतात. त्याने निवडलेल्या भूमिकांचा अनेकांना नंतर पश्चाताप झाला.

28

कतरिना कैफचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'बूम' हा होता. TOI ला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सांगितले होते की, पूर्वी तिला भारतीय संस्कृती आणि परंपरेबद्दल माहिती नव्हती. तिला आधी माहीत असते तर तिने हा चित्रपट केला नसता.

38

बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने राम चरणसोबत 'जंजीर' हा चित्रपट केला होता. दिग्दर्शक अपूर्व लाखीच्या या चित्रपटाला प्रियंका तिच्या करिअरची चूक मानते. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तिने याची कबुली दिली होती.

48

सैफ अली खान 'हमशकल्स' हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मोठी चूक मानतो. असे प्रकार पुन्हा करायला आवडणार नाही, अस तो एकदा म्हणाला होता.

58

अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना हिचं बॉलिवूडमधलं करियर फार मोठं नसलं तरी तिला एक चित्रपट तिची चूक वाटतो. तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की तिला 'फेअर' केल्याबद्दल पश्चात्ताप झाला. या चित्रपटानंतर ट्विंकलने अभिनय क्षेत्राला अलविदा केला.

68

शाहिद कपूर फिल्मफेअरशी संवाद साधताना म्हणतो की, शानदार, चुप चुपके आणि वाह लाइफ हो तो ऐसी हे चित्रपट त्याच्या करियरमधील सर्वात मोठी चूक ठरले आहेत. पण त्यानंतर या अभिनेत्याने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

78

राम गोपाल वर्मा यांचा 'आग' हा चित्रपट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांना वाटले की त्यांनी हा चित्रपट करू नये. एका मीडिया पोर्टलशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पण त्याशिवाय अनेक विविध भूमिका साकारत त्यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते.

88

चित्रपटसृष्टीतील 'सिंघम' म्हणजेच अजय देवगणने रास्कल्स आणि हिम्मतवाला या त्याच्या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, 'मी हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत.' 'हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालणार नाहीत हे त्याला चित्रपट करतानाच कळले होते' असेही तो म्हणाला होता .

  • FIRST PUBLISHED :