'दम लगा के हईशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.
भूमीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले.
पण तिच्या एका भूमिकेची खूपच चर्चा झाली ती म्हणजे 'लस्ट स्टोरीज' या वेब सिरीजमध्ये तिने साकारलेली बोल्ड भूमिका.
2018 साली भूमीने 'लस्ट स्टोरीज'मध्ये काम केले. या सीरिजमध्ये तिने इंटिमेट सीन दिला होता. या सीनविषयी आता भूमीने वक्तव्य केले आहे.
'लस्ट स्टोरीज' वेबसीरिज 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये भूमीचा हा इंटिमेंट सेगमेंट जोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. भूमीने यात मोलकरणीची भूमिका केली होती.
सीरिजमध्ये भूमीला तिचा मालक दाखवण्यात आलेल्या नील भूपालमसह इंटिमेट सीन्स करायचे होते. भूमी हे सीन्स करताना अतिशय अवघडलेली होती.
याविषयी सांगताना ती म्हणाली, 'लस्ट स्टोरीजच्या वेळी मी प्रचंड अवघडले होते. कारण चित्रीकरणावेळी तिथं इंटिमसी कोऑर्डीनेटर नव्हते.'
आपल्या शरीरावर इतके कमी कपडे, समोर असणारी इतकी माणसं पाहून भूमीला प्रचंड अवघडलेपणा वाटत होता.
याविषयी बोलताना भूमी म्हणाली, 'मी नर्वस होते कारण त्यावेळी अनेक लोक असलेल्या एका रूममध्ये माझ्या शरीरावर खूप कमी कपडे होते. सीन शूट करण्यासाठी आम्ही सर्व काळजी घेतली होती.'
इंटिमेट सीनच्या आधी झोयानं भूमीला अवघडलेलं पाहून नील आणि तिला एका बाजुला नेलं आणि सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. एक अभिनेत्री म्हणून भूमीसाठी हा आव्हानात्मक प्रसंगच होता.
भूमीला नुकतीच 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात झळकली होती. येणाऱ्या काळात ती आता 'भीड', 'द लेडी किलर', 'अफवाह' अशा सिनेमांमध्ये दिसणार आहे.