अभिनेत्री भूमी पेडणेकरने बॉलिवू़मध्ये आता ६ वर्षे पूर्ण केली आहेत. अनेक प्रकारच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. एका मुलाखतीत तिने आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ विषयी माहिती सांगितली आहे.
भूमीने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
भूमी स्वतःला फारच रोमॅन्टीक मानते. ती म्हणते की, 'मी खूप रोमँटिक आहे, आणि माझा लग्नावर विश्वास आहे. मला वाटतं की मला ३ ते ४ मुलं व्हावीत.'
पुढे ती म्हणाली की, 'लग्नाबाबत अशा काही गोष्टी आहेत ज्यात मी तडजोड करणार नाही. जर मला माझ्या पसंतीच्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तरच मी लग्न करेन.'
'माझे आईवडील खूपत प्रोग्रेसिव आहेत. लग्न हा कधीच त्यांचा चर्चेचा विषय ठरला नाही. लग्न नेहमीच माझ्यासाठी चॉइस ठरलं आहे.' असंही ती म्हणाली.
कोरोनानंतर शुटींगचा माहोल बदलला आहे, असंही तिने सांगितलं.
शुटींगवर असताना ती आपल्या कुटुंबाला खूप मिस करते. तिला एक जुळी बहीणही आहे.
भूमीला शाहरुख खान, शाहिद कपूर आणि आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे.
भूमी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते.