लाफ्टर क्वीन म्हणून ओळख असणाऱ्या भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचं कपल चाहत्यांना प्रचंड आवडतं. या कपलच्या घरी तीन महिन्यांपूर्वी एका डॅशिंग छोट्या हिरोची एंट्री झाली होती.
भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या या छोट्याशा मुलाचं नाव लक्ष्य असं ठेवलं होतं. त्यांनी बराच वेळ घेऊन आपल्या मुलाचं नाव रिव्हील केलं होतं.
आणि आज भारती आणि हर्ष यांनी स्वतःच्या युट्युब चॅनेलवर एक विडिओ शेअर करत लक्ष्यचा लुक रिव्हील सुद्धा केला आहे.
त्यासाठी दोघांनीही खूप तयारी केल्याचं दिसून आलं आहे.
लक्ष्यच्या रिव्हीलनंतर सगळीकडे भारतीच्या या गोंडस बाळाचे फोटो viral होताना दिसत आहे.
तीन महिन्यांचा लक्ष्य आपल्या गुबगुबीत अंदाजाने आणि निरागस हसण्याने सगळ्यांना इम्प्रेस करताना दिसत आहे.
तसंच लक्ष्यचं बेबी फोटोशूट सुद्धा त्याच्या आईबाबांनी हौसेने करून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचे कृष्णाच्या रुपातले फोटो खूप पसंत केले जात आहेत. कृष्णाच्या रूपात लक्ष्य एकदम गोड दिसत असल्याचं म्हणलं जात आहे.
तसंच हॅरी पॉटर या प्रसिद्ध सिरीजमधील लुकमध्ये सुद्धा त्याचा फोटो प्रसिद्ध होत आहे.
भारतीच्या हजारो चाहत्यांनी आणि फॅन क्लब्सनी हर्ष आणि भारतीच्या मुलाचं खूप कौतुक केलं आहे.
भारतीचा मुलगा तिच्यासारखा क्युट आणि गुबगुबीत दिसतो असं सगळ्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
भारती आपल्या लाडक्या लक्ष्यला गोला अशी हाक मारते.
गेले अनेक दिवस गोलाचा चेहरा पाहण्यासाठी प्रेक्षक आणि चाहते उत्सुक होते.
हर्ष आणि भारती ही जोडी 2017 मध्ये विवाहबंधनात अडकली. तर या जोडप्याने एप्रिल 2022 मध्ये आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली.
त्यांच्या या लुक रिव्हिल व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे तसंच या दोघांवरही शुभेआशीर्वादांचा वर्षाव होत आहे.