छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' आता अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
भाग्य दिले तू मला' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील कलाकार आणि कथा यामुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मालिकेतील राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
मध्यंतरी मालिकेत ट्विस्ट आला होता. पण सगळ्या संकटांवर मात करत अखेर राज आणि कावेरी एकत्र आले आहेत.
मध्यंतरी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता पुढे नक्की काय होणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
मालिकेत राज आणि कावेरी सर्व संकटांवर मात करत अखेर एकमेकांच्या जवळ येणार आहेत. मालिकेत लवकरच या दोघांचं लग्न दाखवण्यात येणार आहे.
नुकतंच त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 'भाग्य दिले तू मला' मालिकेत 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
आता राज आणि कावेरीच्या लग्नामुळे मालिकेला वेगळं वळण येणार असून पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.