भाग्य दिले तु मला मालिकेत मोहितेंच्या घरी धुमधड्याक्यात गणपतीचं आगमन झालेलं आहे.
कावेरी, रत्नमाला आणि सानिया बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास तयारी करताना दिसत आहेत.
सानियाला एरवी कावेरी आवडत नसली तरी बाप्पाने आता या दोघीना एकत्र आणलं आहे.
मोदकांची खास रेसिपी रत्नमालाची असून त्या स्वतःच्या हाताने बाप्पाचा नैवेद्य तयार करत आहेत.
तसेच सेटवर सानियाला मोदक कसे बनवायचे याचं ट्रेनिंग मिळत आहे.
मोहितेंच्या बाप्पाला यावर्षी कावेरीच्या हातचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.
कावेरी आणि सानिया दोघीही धम्माल करताना दिसत आहेत.
सानिया आणि कावेरी एकत्र मिळून बाप्पासाठी खास मोदक बनवत आहेत. त्यामुळे सध्या मोहितेंच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.