‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेतील अनीता आणि विभूती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अनिताचा म्हणजे सौम्या टंडनचा नवरा देखील विभूती इतकाच दिसायला हॅण्डसम आहे. (फोटो साभार-instagram @saumyas_world_)
सौम्या टंडन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. मालिकेच्या दुनियेपासून ती दूर असली तरी अजूनही प्रेक्षकांमध्ये तिची कमालीची क्रेझ पाहायला मिळतेयययययय. (फोटो साभार- इंस्टाग्राम @saumyas_world_)
सौम्या टंडन एक उत्तम अभिनेत्री आहे तसेच ती एक स्टाईल आयकॉन देखील आहे, चाहत्यांना अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो पाहायला खूप आवडतात.
सौम्या सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. पण खूप कमी लोकांनी तिच्या मुलाचे आणि नवऱ्याचे फोटो पाहिले असतील.
सौम्या टंडनने एका खास निमित्ताने सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. तिचा नवरा सौम्या जितकी सुंदर आहे तितकाच तो हॅण्डसम देखील आहे. (फोटो साभार-instagram @saumyas_world_)
तिच्या या फोटोनंतर तिचा ऑनस्क्रीन नवरा विभूती नारायण म्हणजे आसिफ शेखने देखील कमेंट करत दोघांचं कौतुक केलं होतं. (फोटो साभार-instagram @saumyas_world_)
सौम्या टंडन सध्या एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. तिनं शो ‘भाभी जी घर पर हैं’ मालिका सोडली आहे. सध्या ती कुठल्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही पण ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.