साऊथ चित्रपटसृष्टीनंतर बॉलिवूडमध्ये देखील नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे इलियाना डी क्रूझ. तिने बर्फी, बिग बुल, रेड यासारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलेलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने आज सकाळी आपल्या खाजगी आयुष्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
अभिनेत्रीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे.
इलियाना तिच्या पहिल्या बाळाला लवकरच जन्म देणार आहे. पण इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांची ओळख गुप्त ठेवली आहे.
तिने ही घोषणा करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
इलियानाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. तसेच चाहत्यांना बाळाच्या वडिलांबद्दल जाणून घेण्याची देखील उत्सुकता आहे.
इलियानाच्या खाजगी आयुष्याविषयी सांगायचं तर ती काही वर्षांपूर्वी अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे लग्न झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही मात्र अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एकदा नीबोनला 'सर्वोत्तम पती' म्हणून संबोधले होते.
त्यानंतर 2019 मध्ये मात्र त्याच्याशी ब्रेकअप झाल्याचं इलियानाने सांगितलं होतं.
सध्या इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. कॉफी विथ करण सीझन 7 च्या एका एपिसोडवर, करण जोहरने त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती.
गेल्या वर्षी, कतरिना कैफने मालदीवमध्ये काही मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन केले होते. त्यात इलियानाचा देखील समावेश होता. म्हणूनच आता कतरिनाचा भाऊ इलियानाच्या होणाऱ्या बाळाचा बाबा आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.