बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीने काळ क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. अखेर काल दोघे विवाहबद्ध झाले.
31 वर्षांपूर्वी सुनील शेट्टीने मुस्लिम तरुणी मना कादरीशी लग्न केले होते.
नेपियन सी रोडवरील पेस्ट्री पॅलेसमध्ये जेव्हा सुनील शेट्टीने मानाला पहिल्यांदा पाहिलं. सुनीलला माना पहिल्या नजरेतच आवडली होती.
सुनीलने त्याच्या वयाच्या इतर कोणत्याही मुलाने जे केले असते तेच केले. त्याने मानाच्या बहिणीशी मैत्री केली जेणेकरून त्याला तिच्या जवळ जाता यावे.
यानंतर बहिणीने दोघींची बोलणी करून दिली. सुनील शेट्टी आणि माना हळू हळू एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
दोघांना त्यांच्या सांस्कृतिक फरकांची जाणीव होती. एका बाजूला, माना ही गुजराती मुस्लिम (वडील) आणि पंजाबी हिंदू (आई) कुटुंबातील मुलगी होती. दुसरीकडे, सुनील हा कर्नाटकातील तुळू भाषिक कुटुंबातील होता.
9 वर्षांच्या प्रेमजीवनानंतर सुनील शेट्टी आणि माना शेट्टी 25 डिसेंबर 1991 रोजी विवाहबद्ध झाले. सुनील हा त्या भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी लग्न केले होते.
या दोघांचा विवाह हिंदू पद्धतीने झाला होता. आता अथिया शेट्टी आणि राहुलच्या लग्नानंतर या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा होत आहे.