‘आता होऊ दे धिंगाणा' या शोच्या नवीन भागात 'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेचे कलाकार सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमात दोन्ही मालिकांतील कलाकार धमाल करताना दिसणार आहेत.
'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या दोन्ही मालिकांतील कलाकारांमध्ये जिंकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण त्यासोबतच कलाकार दंगा-मस्ती करताना दिसणार आहेत.
‘आता होऊ दे धिंगाणा' कार्यक्रमात तुमचे लाडके कलाकार कीर्ती आणि शुभमने एकमेकांची पोलखोल केली. शुभमने कीर्ती कशी भांडते याची भन्नाट गोष्ट सांगितली.
शुभमने कीर्तीविषयी भन्नाट किस्सा सांगितलं. त्याने थेट तिची मिमिक्रीच करून दाखवली.
शुभमने कीर्ती कशी भांडते याची भन्नाट गोष्ट सांगितली. कीर्ती भांडता भांडताच रडते असं त्याने सांगितलं.
यावेळी शुभमने कीर्तीचा आवाज काढला. आणि तिच्यासारखंच भांडून दाखवू लागला. शुभमने केलेली कीर्तीची मिमिक्री ऐकून यावेळी मंचावर चांगलाच हशा पिकला
‘आता होऊ दे धिंगाणा' मंचावर शुभमने सांगितलेला हा किस्सा आता चांगलाच व्हायरल होत आहे.
'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेला सध्या नवीन वळण लागलं आहे. शुभम सध्या कीर्तीला पूर्णपणे विसरला आहे. त्यामुळे मालिका बघणं अधिक रंजक होत चाललं आहे.