मागच्या अनेक दिवसांपासून ज्या अभिनेत्याच्या न्यूड फोटोशूटने नुसती खळबळ माजवली आहे तो अभिनेता म्हणजे रणवीर सिंह. रणवीरच्या न्यूड फोटोंमुळे अनेक पडसाद उमटल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर अनेक अभिनेत्यांनी सुद्धा स्वतःच न्यूड फोटोशूट करायला सुरुवात केली असून त्यात बिग बॉस फेम अभिनेता असीम रियाजचं सुद्धा नाव जोडलं जात आहे.
असिम हा नेहमीच आपलं फिट आणि बलदंड शरीर अनेक फोटो आणि व्हिडिओमधून दाखवत आला आहे. त्याच्या या फोटोंच्या सीरिजने सध्या खळबळ उडवली आहे.
त्याच्या पोस्टवर हे फोटो 2017 मध्ये क्लिक केले असून यामध्ये तो एकदम फिट आणि हँडसम हंक दिसत आहे.
मात्र त्याच्या या फोटोंवर सध्या बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट आणि प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
काहींनी रणवीरचा उल्लेख करत ‘रणवीर भाऊंनी सगळ्यांना बिघडवून टाकलं’ असं म्हटलं आहे. तर काहींनी रणवीरची प्रेरणा घेतल्याचं लिहिलं आहे. काहींनी त्याच्या या फोटोंवर हाय गर्मी असं लिहीत त्याचं कौतुकही केलं आहे.
असिम हा एक फिटनेस फ्रिक व्यक्ती आहे. त्याने नेहमीच अनेक फोटोंच्या माध्यमातून आपली बॉडी आणि डॅशिंग अंदाज flaunt केला आहे.
दरम्यान रणवीरच्या या फोटोशूटवर सुद्धा बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. काहींनी याला एक कलात्मक प्रयोग म्हणलं आहे तर काहींनी त्याची बाजू घेत मुलींनाही जरा डोळे भरून घेऊ दे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडमधील अनेकांनी त्याला सपोर्ट केला असून त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे. रणवीरचं हे फोटोशूट बरंच वादातीत सुद्धा ठरत आहे पण यातून प्रेरणा घेऊन केलेलं असिमचं हे फोटोशूट सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.