हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून काम करणारे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं.
वयाच्या 60व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं.
दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.
आशिष विद्यार्थी यांच्याबरोबर लग्न करणाऱ्या रुपाली बरुआ या नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
रुपाली बरूआ या आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर आहेत.
त्यांचं स्वत:चं फॅशन स्टोअर असून त्या स्वत: त्यांचा बिझनेस चालवतात.
दिसायला देखण्या असेलल्या रुपाली स्वत:च्या ब्रँडसाठी त्या मॉडेलिंगही करतात. त्यांच्या सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटोशूट देखील पाहायला मिळतंय.
आशिष यांचं आधी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांच्या एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.