NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sukanya Arun Kadam Baby Shower : अरुण कदमच्या लेकीने डोहाळे जेवणासाठी परिधान केला खास दागिना; बाजारात आहे मोठी मागणी

Sukanya Arun Kadam Baby Shower : अरुण कदमच्या लेकीने डोहाळे जेवणासाठी परिधान केला खास दागिना; बाजारात आहे मोठी मागणी

अभिनेते अरुण कदम यांच्या लेकीचं डोहाळे जेवण मोठ्या थाटात पार पडलं. डोहाळे जेवणासाठी सुकन्या कदम हिने खास दागिना परिधान केला होता. काय आहे तो दागिना पाहूयात.

110

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके दादूस आता आजोबा होणार आहेत.

210

अरुण कदम यांची लेक सुकन्या अरुण कदम लवकरच आई होणार आहे. काही दिवसांआधीच सुकन्यानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी दिली होती.

310

लेक आई होणार असल्यानं अरुण कदम फार खुश आहेत. लेकीचं डोहाळे जेवणही त्यांनी थाटात साजरं केलं.

410

सुकन्या अरुण कदमच्या डोहाळे जेवणाचे फोटो नुकतेच तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटोंना अल्पावधतीच चाहत्यांचं प्रेम आणि शुभेच्छा मिळाल्यात.

510

दरम्यान सुकन्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात फार सुंदर दिसत होती. हिरवी साडी आणि दागिन्यांमध्ये सुकन्याचं आईपण फारच खुललं होतं.

610

बेबी बंप फ्लॉन्ट करत सुकन्यानं डोहाळे जेवण आनंदात एन्जॉय केलं.

710

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात फुलांचे सुंदर दागिने तिनं परिधान केले होते. सोबत नाकात नथ, केसात फुलांचे गजरे तिच्यावर फार शोभून दिसत होते.

810

पण सुकन्यानं डोहाळे जेवणात घातलेल्या एका दागिन्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. तो दागिना म्हणजे तिची सोन्याची टिकली.

910

चंद्रकोर टिकलीच्या खाली सुकन्यानं सोन्याची चंद्रकोर कपाळावर परिधान केली आहे. त्या चंद्रकोरीवरील छोटे मणी सुकन्याच्या संपूर्ण लुकची शोभा वाढवत होते.

1010

सोन्याची चंद्रकोर ही सध्या बाजारात ट्रेंड करत आहे. लावण्यासाठी अगदी सोपी आणि दिसायला सुंदर, साजेश्या या सोन्याच्या चंद्रकोरीला बाजारात मागणी आहे.

  • FIRST PUBLISHED :