अभिनेता अर्जुन रामपालने नुकतीच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेला फोटो त्याची मुलगी मायरा रामपालचा आहे.
अर्जुन रामपाल आणि त्याची माजी पत्नी आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाची मुलगी मायरा रामपालने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे प्री-फॉल फॅशन शो 2023 मध्ये रॅम्पवर पदार्पण केले.
अर्जुन रामपालची मुलगी मायरा अवघ्या 17 वर्षांची आहे. पण इतक्या लहान वयातच रॅम्पवॉक करत तिने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
अर्जुन रामपालची मुलगी मायरा खुपच ग्लॅमरस दिसते. तिचं सोशल मीडियावर देखील चांगलंच फॅन फॉलोईंग आहे.
अर्जुन रामपाल लेकीचं रॅम्पवॉक पाहताच भावुक झाला असून त्याने एक खास पोस्ट तिच्यासाठी शेअर केली आहे.
त्याने लिहिलंय कि, 'आज माझी सुंदर छोटी राजकुमारीने तिचा पहिला रॅम्पवॉक केला. तेही ऑडिशनपासून ते फिटिंगपर्यंत सगळं काही स्वतःच्या हिमतीवर केलं. कठीण स्पर्धेतून तिची निवड झाली. मला तिचा खूप अभिमान वाटला.'
तो पुढे म्हणाला, 'इथूनपुढे तुला अधिक यश, प्रेम आणि आनंद मिळावा अश्या शुभेच्छा देतो. अभिनंदन मायरा... तू स्टार आहेस.' असं म्हणत अर्जुन रामपाल भावुक झाला आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम झाला. यात विराट कोहली, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर आणि ईशा अंबानी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.