ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू आणि शशांक या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे.
मालिकेतून शशांकशी भांडून घर सोडून गेलेली अप्पू पुन्हा एकदा खानिटकरांच्या घरी परतणार आहे.
अखेर अप्पूचा राग घालवण्यात आणि गैरसमज दूर करण्यात शशांकला यश आलं आहे.
शशांकने त्याच्या मनातील प्रेमाची भावना देखील अप्पूला बोलून दाखवली असून दोघांमध्ये आता नव्याने प्रेम बहरताना दिसणार आहे.
मला तुझ्याबरोबर पळून जायचं आहे अशी इच्छा अप्पूने बोलून दाखवली होती. त्यानुसार आता शशांक अप्पूला पळवून कानिटकरांच्या घरी घेऊन जाणार आहे.
दरम्यान दोघांचे काही फोटो समोर आले आहेत.
अप्पू आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
दोघांचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अप्पू आणि शशांक यांचा हा नवा अवतार पाहून प्रेक्षकांनीही मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
अप्पू कानिटकरांच्या घरी परतल्यानंतर आता काय नवी धम्माल उडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.