अप्पी आमची कलेक्टर फेम अर्जुन शेहनशाह म्हणून घराघरात लोकप्रिय झाला. ही भूमिका अभिनेता रोहित परशुरामने साकारली आहे.
मालिकेत जरी त्याच्या आयुष्यात वादळ आलेलं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या जीवनात सुखाचे क्षण आले आहेत.
अभिनेता नुकताच बाबा झाला आहे.
रोहितला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. रोहितची बायको पूजा हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
रोहितनं गुड न्यूज देताच चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
विशेष म्हणजे मालिकेतही अर्जुन आणि अप्पीच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत.
मालिकेआधीच अर्जुनने खऱ्या आयुष्यात चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
रोहित परशुरामचे चाहते त्याला आता आगामी प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.