अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लेक वामिकासोबत सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आता आपल्या आवडत्या स्टार्सला समोर पाहून चाहत्यांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा आवडता क्रिकेटर विराट कोहली यांना आपल्यामध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काहींनी ऑटोग्राफ तर काहींनी सेल्फी घेतले. विराट कोहलीच्या फॅन्स क्लबने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांची लहान मुलगी वामिकासह उत्तराखंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. दोघांनीही चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत फोटो काढले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. या सेलिब्रिटी कपलचे सर्व फोटोज चाहत्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आली आहेत.
अनुष्का आणि विराट मल्ला श्यामखेतच्या आसपासच्या ग्रामीण भागात फिरायला गेले होते. तेव्हा आवडत्या स्टार्सना पाहून चाहत्यांनी चाहत्यांनी ते क्षण कॅमेरात कैद करायची संधी सोडली नाही
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नैनिताल, अल्मोरा, कुमाऊं, बिनसारच्या सुंदर ठिकाणी फिरताना दिसले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काकडीघाट येथील बाबा नीम करौली महाराज यांच्या आश्रमालाही भेट दिली.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी कैंची धाम आश्रमात अनेक तास घालवले. यावेळी त्यांनी ब्लँकेटचेही वाटप केले.