NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आधी पती, मग तरुण मुलाला गमावलं; आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना आनंद देणाऱ्या या गायिकेने मात्र सोसलं खूप दुःख

आधी पती, मग तरुण मुलाला गमावलं; आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना आनंद देणाऱ्या या गायिकेने मात्र सोसलं खूप दुःख

बॉलिवूडमध्ये एक सो एक हिट गाणी देणारी गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. आपल्या आवाजाच्या जोरावर या गायिकेने बॉलीवूड चित्रपटातील रोमँटिक गाणी तर हिट केलीच पण त्यांच्या आवाजातील भजनांच्या कॅसेटने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आपल्या मधुर आवाजाने अनुराधा यांनी एकेकाळी बॉलिवूडमध्ये एवढी कीर्ती मिळवली होती की, त्यांची तुलना लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज गायिकांसोबत होऊ लागली होती. अनुराधाला प्रसिद्धी मिळाली पण तिच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना खूप दुःखाचा सामना करावा लागला.

17

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. अनुराधाने 'अभिमान' चित्रपटातून आपल्या गाण्याच्या करिअरची सुरुवात केली.

27

यानंतर त्यांनी 'कालीचरण' आणि 'आपबीती' सारख्या चित्रपटातही गाणी गायली. यानंतर अनुराधाने एकापेक्षा एक गाणी गायली. तेव्हा त्यांची तुलना लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज गायिकांसोबत होऊ लागली होती.

37

बॉलीवूडमध्ये अनुराधाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र दुखणे भरलेलं होतं. अनुराधा यांचा विवाह 1969 मध्ये संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झाला होता. अनुराधा यांना आदित्य आणि कविता ही दोन मुले होती.

47

1 नोव्हेंबर 1991 रोजी अरुण यांचे निधन झाल्याने अनुराधा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अनुराधा एकट्या पडल्या.

57

अनुराधा यांची मुलगी कविता देखील एक गायिका आहे परंतु अनुराधाला आणखी एक धक्का बसला जेव्हा त्यांचा मुलगा आदित्यचा 2020 मध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला.

67

काही बातम्यांवर विश्वास ठेवला तर, टी-सीरीजचे गुलशन कुमार अनुराधाच्या आयुष्यात आले होते. दोघांचे ट्युनिंग खूप चांगले होते आणि अनुराधा टी-सिरीजसाठी बहुतेक गाणी म्हणत. दोघे चांगले मित्र होते. पण इथेही नशिबाने दगा दिला आणि गुलशन यांचा मृत्यू झाला.

77

गुलशन यांच्या निधनानंतर अनुराधा बॉलिवूडपासून दुरावल्या. त्या फक्त भजन म्हणू लागल्या. सध्या त्या मुलगी कविता पौडवालसोबत राहतात.

  • FIRST PUBLISHED :