अनुपमा फेम अभिनेता रुशद राणा यानं वयाच्या 43व्या वर्षी केतकी वालावलकर या मराठमोळ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न केलं.
रुशदचं हे दुसरं लग्न आहे. दोघांनी मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं. अनुपमा मालिकेतील सगळ्या कलाकारांनी दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
अभिनेता रुशद राणा हा पारसी आहे आणि केतकी ही मराठमोळी मुलगी आहे. दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
'केतकीबरोबर पहिल्यांदा डेटला गेलो तेव्हाच मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला', असं रुशदनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रुशद हा अनुपमा मालिकेत अनिरुद्ध गांधीची भूमिका साकारत आहे. तर केतकी ही अनुपमा मालिकेची डायरेक्टर आहे.
अभिनेता रुशद राणाचं 2010मध्ये पहिला लग्न झालं होतं पण ते फार काळ टिकू शकलं नाही. 3 वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.
रुशदच्या पहिल्या बायकोला त्याचं अभिनय करणं आवडत नव्हतं. यामुळे त्यांच्या नात्यात अनेकदा खटके उडले.