मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.
अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी हे प्रमुख पात्र उत्तमरित्या साकारलं. अमृताच्या अदांनी सगळेच घायाळ झाले होते.
विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कांदबरीवरील आधारित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतील उतरला.
आता अमृताने नुकतीच नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
अमृता खानविलकर येणाऱ्या काळात 'कलावती' या सिनेमात झळकणार आहे.
नुकतंच चित्रपटाचं पोस्ट रिलीज झालं आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.
या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी पोस्टरवरून 'कलावती' ची कथा आणि अमृताची भूमिका चंद्रमुखी सारखीच असेल असा अंदाज आहे.
अमृताने नव्या सिनेमाची घोषणा करताच तिच्यावर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता तिला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.