बिग बॉस मराठीच्या घरात सुर जुळलेल्या अभिनेता प्रसाद आणि अमृता यांनी नुकताच साखरपुडा केला.
प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी गुपचूप उरकलेल्या या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली.
घरच्या घरी छोटेखानी साखरपुड्यानंतर दोघांनी फोटोशूट करत सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
दोघांचं ब्लॅक आऊटफिट्समधील फोटोशूट पाहून चाहत्यांना काही कमेंट्स आवरत्या घेत्या आल्या नाहीत. दोघांच्या फोटोशूटवर कमेंट्चा पाऊस पडलाय.
दोघांचं रोमँटिक अँड सेक्सी फोटोशूट पाहून एका चाहत्यांने "में जोरो का गुलाम बनके रहूंगा", अशी कमेंट केली आहे.
तर आणखी एका युझरनं "मराठी आलिया रणबीर", असं देखील म्हटलं आहे.