साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा-द राईज' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड केले होते. आता या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे कथेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे.
'पुष्पा : द रूल' साठी अल्लू अर्जुनने थोडी थिडकी नाही तर तब्बल 85 कोटी रुपये आकारले असल्याचं कळतंय.
अल्लू अर्जुनने आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आकारत फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
अल्लू अर्जुनने आकारलेल्या या फीची सगळीकडेच चर्चा होतेय.
पहिल्या भागाप्रमाणेच आता ‘पुष्पा : द रुल’ या दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.